Monday 1 April 2019

प्रेमात पडलो जरी आम्ही

प्रेमात पडलो जरी आम्ही तरी कधीच आम्हाला लागत नाही
कारण एकीवर एकदाच प्रेम करून आमचं कधीच भागत नाही..

कितीक विविधता नवतरुणींची  कितीक चांदण्या आकाशी
जाई.. जुई.. रातराणी.. केवडा.. उगाच दरवळ नाकाशी..
आमही चक्कर मारतो बागेत फक्त.. सुगंध कधी मागत नाही
कारण एकीवर एकदाच प्रेम करून आमचं कधीच भागत नाही..

सोडून जाता आम्हा बालिका विरह वेदना ठणकत बसते..
कितीक पहिल्या .. अनुभवल्या.. परि अंती सोबत कूनीच नसते
समजावतो प्रत्येक वेळी मी मनाला.. उगाच रात्री मी जागत नाही..

कारण एकीवर एकदाच प्रेम करून आमचं कधीच भागत नाही..

- जोशी

No comments:

Featured post

Sportsmanship Everywhere: A Universal Virtue

  "Sportsmanship Everywhere: A Universal Virtue" is not just a statement, but a philosophy that underscores the importance of appl...